Yavatmal News: घाटंजीतील ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले
Agricultural Crisis: घाटंजी तालुक्यातील किन्ही येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. बँकेचे कर्ज आणि अतिवृष्टीमुळे त्याचे जीवन अडचणीत आले होते.
घाटंजी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील किन्ही येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी घडली.