ट्रॅक्टरने शेतात जायला निघाला शेतकरी, पण वाटेतच काळाने घातली झडप

tractor accident
tractor accident

लाखांदूर (जि. भंडारा ) : शेतीकामासाठी ट्रँक्टरने अन्य एकासह जात असलेल्या ट्रँक्टरचालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रँक्टर उलटून घडलेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील मासळ-घरतोडा मार्गावरील तलावानजीक घडली. ही घटना बुधवारी (ता. १५) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. देविदास मारोती कानेकर (५५) असे मृत ट्रँक्टर चालकाचे तर विजय विनायक मटाले (४०) असे अन्य एका गंभीर जखमीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, चालक व गंभीर जखमी सकाळच्या सुमारास मासळ येथून घरतोडाकडे शेतीकामासाठी महिंद्रा ट्रँक्टरने जात होते. यावेळी अचानक मास घरतोडा मार्गावरील तलावानजीक ट्रँक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रँक्टरने चक्क रस्त्यावरून शेतात पलटी घेतली. या अपघातात ट्रँक्टर चालकासह अन्य जखमी देखील इंजीनखाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ट्रँक्टरच्या ट्रॉलीवर अथवा इंजीनवर वाहन क्रमांकाची नोंद नाही, हे विशेष.

मासळ येथील घटना
या अपघाताची माहिती परीसरातील जनतेसह लाखांदूर पोलिसांना मिळताच ठाणेदार शिवाजी कदम व अन्य पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोतले. त्यांनी इंजिनखाली दबलेल्या गंभीर जखमीला बाहेर काढून रुग्णालयात हलविले, तर मृत चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदुर येथे पाठविला. या अपघाताची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोऊनि प्रमोद कुरसुंगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com