अमरावती - ‘ही आरपारची लढाई आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या कळत नाहीत, हे शल्य आहे. कर्जमाफीसाठी पुकारलेला एल्गार माझ्या जीव जाण्याने पूर्ण होत असेल तर मी त्यासाठीही तयार आहे. सध्या महात्मा गांधींच्या मार्गाने बेमुदत उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा व उपोषणकर्त्यांचा अंत बघू नये. आम्हाला भगतसिंगदेखील होता येते,’ असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला.