भुईमूगाला नाही शेंगा, कांद्याला नाही भाव

सुनील धुरडे
शनिवार, 19 मे 2018

भूईमूग काढण्याचे काम अंतिम टप्प्यात
भुईमूग काढण्यासाठी आदिवासी मजूर मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे भुईमूग काढणीला वेळ लागत नाही. ३०० ते ३५० रूपये क्विंटल ने भूईमूग काढणी करावी लागत आहे. भुईमूग काढणीसाठी आलेल्या आदिवासी बांधवांना जिवाची पर्वा न करता आपल्या बायका मुलांसह भुईमूग काढणीचे काम करावे लागत आहे .

अकोला (दानापूर) : यंदा भुईमूगाला शेंगा कमी लागल्याने उत्पादनात घट झाली. तर कांद्याला भाव मिळत नसल्याने भुईमूग व कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

भुईमूगाला प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. तेल्हारा तालुक्यातील वान नदीच्या काठावर वसलेल्या दानापूर, वारखेड, वारी भैरव गड, सौंदळा, सोगोडा, बोरखेड गावावर वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्पाची कृपा आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने त्याच बरोबर या वर्षीच्या भयंकर तापमानात दानापूर सह परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. तरीही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग व कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. मात्र भुईमूगाला शेंगा कमी व भावही कमी आहे .कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. भुईमूगाचे एकरी उत्पादन १० ते १२ क्विंटलच्या जवळपास आहे. उत्पादन झाल्यानंतर चार दिवसांनी सुकल्यावर निम्मी घट लागते. या भुईमूगाला ३००० ते ३२०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने भुईमूगाला लागलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .

भूईमूग काढण्याचे काम अंतिम टप्प्यात
भुईमूग काढण्यासाठी आदिवासी मजूर मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे भुईमूग काढणीला वेळ लागत नाही. ३०० ते ३५० रूपये क्विंटल ने भूईमूग काढणी करावी लागत आहे. भुईमूग काढणीसाठी आलेल्या आदिवासी बांधवांना जिवाची पर्वा न करता आपल्या बायका मुलांसह भुईमूग काढणीचे काम करावे लागत आहे .

मी तीन एकर भुईमूग लागवड केली होती. मला तीन एकरात १३ ते १४ क्विंटल भुईमूग झाला. त्यात भाव ३००० ते ३२०० रूपये खर्चही निघत नाही. शासनाने भूईमूग उत्पादक शेतकऱ्यांना सात हजार रूपये भाव द्यावा .
- सुरेश कुऱ्हाडे, शेतकरी, दानापूर

Web Title: farmer problem in Akola