शेतकरी झाला खूष; आणि रॅंचोने बनविले फवारणी यंत्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

हरीश काळे असे या जुगाडू शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये फवारणीसाठी टाकाऊ वस्तूंपासून फवारणी यंत्र बनविले आहे. या यंत्रासाठी त्यांनी आपल्याच शेतातील लोखंडी पाइप, प्लास्टिक पाइप, नोझल्स, एक चाक आणि रिचार्ज होणारी बॅटरी आदी साहित्याचा वापर केला. अत्यंत कमी खर्चात त्यांनी घराच्या घरी हे फवारणी यंत्र बनविले

यवतमाळ : मागील काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने नापिकीचा सामना करीत आहे. एकीकडे मालाला भाव मिळत नाही. तर, दुसरीकडे उत्पादन खर्च वाढत आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. राळेगाव तालुक्‍यातील रिधोरा येथील रॅंचो शेतकऱ्याने शेतातीलच टाकाऊ वस्तूंपासून फवारणी यंत्र बनविले. 

हे वाचा— सगळा आंधळाच कारभार! आंधळगाव पोलिस स्टेशन इमारतीचे वय तब्बल 109 वर्षे?

हरीश काळे असे या जुगाडू शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये फवारणीसाठी टाकाऊ वस्तूंपासून फवारणी यंत्र बनविले आहे. या यंत्रासाठी त्यांनी आपल्याच शेतातील लोखंडी पाइप, प्लास्टिक पाइप, नोझल्स, एक चाक आणि रिचार्ज होणारी बॅटरी आदी साहित्याचा वापर केला. अत्यंत कमी खर्चात त्यांनी घराच्या घरी हे फवारणी यंत्र बनविले. या यंत्रामुळे एकाचवेळी शेतीचे पाच तास फवारून होतात. या यंत्राने तणनाशक, कीटकनाशक, प्रवाहित खते आणि झाडाला लागणारे टॉनिक हे फवारल्या जाऊ शकते. एका तासात सुमारे एक एकर शेत फवारून होते. शिवाय मजुरीही वाचते. यात मशीनमध्ये पाणी टाकून प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना दाखविले जात आहे. हरीश काळे आपल्या शेतात विविध प्रयोग राबविण्यासाठी पंचक्रोशीत ओळखले जातात. पिकांवर कीटकांच्या होणाऱ्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी प्रत्येकच शेतकरी फवारणी करतात. मागील काही वर्षांत किडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फवारणी ही करावीच लागते. 

काळजी घेणे आवश्‍यक 
दोन वर्षांपूर्वी कीटकनाशक फवारणीने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे जीव गेले होते. दरवर्षी शेकडो शेतकरी बाधित होतात. फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्याप्रमाणे काळजी घेतल्यास शेतकरी, शेतमजुरांना फवारणीदरम्यान होणारी बाधा टाळता येऊ शकते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer was happy; And a sprayer made by Rancho