डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच एपीएमसीत शुकशुकाट; सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आवक मंदावली 

farmers are not coming in APMC wardha
farmers are not coming in APMC wardha
Updated on

वर्धा: खरीप हंगाम शेतकऱ्यांकरिता यंदा फायद्याचा कमी तोट्याचाच अधिक ठरला. साधारणत: डिसेंबर महिन्यात बाजार समितीत सोयाबीन उत्पादकांची गर्दी असते. यंदा मात्र तसे नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा असतानाच बाजार समितीत शेतकऱ्यांची आवक मंदावली आहे. येथे केवळ व्यापाऱ्यांचीच वर्दळ दिसत आहे.

यंदा सोयाबीनवर आलेली खोडकीड आणि उत्पादन निघण्याच्या काळात आलेला पाऊस यामुळे सोयाबीनच्या उत्पादन प्रभावित झाले. यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. प्रारंभी हिरवे दिसणारे सोयाबीन पीक पाहून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची आशा निर्माण झाली. पण आलेल्या किडीने सोयाबीन उत्पादकांचे स्वप्न धुळीस मिळाले. एकरी सात ते दहा पोते सोयाबीनचा उतारा घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मात्र क्‍विंटलचीही उतारी आली नाही.

शेतात असलेले सोयाबीन सवंगण्याची स्थिती नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडली. काही शेतकऱ्यांनी थेट शेतात रोटावेटर टाकून जमीन नव्या हंगामाकरिता तयार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यंदाच्या हंगामातही बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली. शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसल्याने बाजारात प्रारंभीच्या काळात सोयाबीन आले नंतर आवकच बंद झाली. 

डिसेंबरचा पहिला आठवडा सोयाबीनच्या आवकीचा असताना येथे शेतकऱ्यांकडून कुठलेही सोयाबीन आले नाही. एवढेच काय येथे शेतकरीही फिरकले नसल्याचे वर्धा बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. असाच प्रकार विदर्भात नावलौकीक असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतही घडला आहे.

आलेले सोयाबीन काळवंडलेले

बाजार जे सोयाबीन आले ते काळवंडलेले आणि दर्जा नसलेले होते. यामुळे शेतकऱ्यांना पड्या दरात सोयाबीन विकावे लागले. केवळ असलेली आर्थिक अडचण आणि स्थिती यामुळे शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावे लागले. यात मिळालेल्या दरात शेतातून सोयाबीन काढण्याची मजुरीही निघाली नाही.

नाफेडचा तर मुहूर्तही नाही

शेतकऱ्यांना हमीभाव देण्याकरिता शासनाच्या वतीने नाफेडची खरेदी सुरू केली. या खरेदीकरिता पहिले नोंदणी करणे बंधनकारक होती. या नियमानुसार शेतकऱ्यांनी नोंदणीही केली. पण नसलेल्या सोयाबीनमुळे शेतकऱ्यांना बाजारातच दर मिळाल्याने नाफेडच्या खरेदीचा मुहूर्तही झाला नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com