'जुगाडगाडी' बनली शेतकऱ्यांचा साथी; ग्रामीण भागांमध्ये ठरतेय आकर्षणाचा विषय 

farmers are using Jugad gadi for work
farmers are using Jugad gadi for work
Updated on

धामणगावरेल्वे ( जि. अमरावती ) ः तालुक्‍यातील कावली येथील मारुती साळवण यांनी आपल्या डोक्‍यातील कल्पना प्रत्यक्षात साकारून जुगाडगाडी बनविली आहे. ही गाडी शेतकऱ्यांच्या सेवेत प्रदान करून त्यांचा शेतीमाल घरी पोहोचविण्यासाठी मदत सुरू केल्याने ही जुगाडगाडी पाहण्यासाठी अनेक लोक येत आहेत.

शेतकऱ्यांचा सच्चा साथी बैलगाडी आहे. परंतु विज्ञानाने प्रगती केल्याने बैलगाडीकडे दुर्लक्ष झाले व बैलगाडीची संख्या घटत गेली, सोबतच बैलांचीही संख्या घटली. आता शेतीतील प्रत्येक माल शेतकरी ट्रॅक्‍टरने किंवा मिनीडोरने आपल्या घरी घेऊन जातात. पण यावर मात करण्यासाठी कावली येथील  मारुती साळवण यांनी दुचाकीवर जुगाड बनवून शेतकऱ्यांचा माल पोहोचविण्यासाठी सेवा देत असल्याचे सांगितले.

शेतीची कामे करण्यासाठी, मजुरांची ने-आण करण्यासाठी याचा उपयोग होतो. साधारणतः गाडीला दहा हजार रुपये खर्च आला असून यामध्ये किमान चार ते पाच लोकं आरामात बसू शकतात, अशी व्यवस्था केली आहे. तसेच पाच क्विंटल शेतीतील माल घरी पोहोचू शकते, इतकी क्षमता या जुगाडगाडीची असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे बैलबंडीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच ठेवावा लागतो, कारण ट्रॅक्‍टर किंवा कोणतेही वाहन त्याठिकाणी जात नाही. मात्र जुगाडगाडी कुठेही जाऊ शकते. सदर गाडीला दुचाकीची दोन चाके व लोखंडी चौकोनी आकाराचा डब्बा केला असून तो त्यावर फीट केला आहे व दुचाकीच्या पाठीमागच्या बाजूस एक रॉड बसविला आहे. 

या माध्यमातून गाडी सहज ओढल्या जात असल्याचे श्री. साळवण यांनी सांगितले.  शेतकऱ्यांच्या सेवेत ही जुगाडगाडी आली असल्याने ग्रामीण भागामध्ये ती आकर्षण ठरले असल्याचे दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com