Video : शेताच्या बांधावर अन्नदात्याचा सन्मान,राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार बहाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांना गुरुवारी (ता.21) राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

अमरावती : कोरोनाच्या भितीने सा-या जगात टाळेबंदी असली तरी जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र उन्हातान्हात राबतोच आहे. त्याच्या कष्टांचा सन्मान करण्यासाठी त्यांना नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांना गुरुवारी (ता.21) राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
उत्कृष्ट तिफनकरी शेतमजूर म्हणून ज्ञानेश्‍वर नांदणे यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

यावर्षी उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट पत्रकारिता, कृषी शास्त्रज्ञ, महिला उद्योजक, बियाणे उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट गोपालक शेतकरी, उत्कृष्ट बैलजोडी मालक शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी अशा विविध क्षेत्रातून निवड करण्यात आली व प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आयोजक व राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे तसेच माजी मंत्री वसुधाताई देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तसेच शेतकरी निवड समितीच्या पौर्णिमा सवाई, किशोर चांगोले, भैय्यासाहेब निचळ, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, पुरुषोत्तम घोगरे, प्रदीप जगताप, नंदूभाऊ बंड, मिलिंद फाळके, ऍड. धनंजय तोटे, विक्रम ठाकरे, ऐनुल्ला खान, विनोद जायलवाल, प्रा. सतीश कडू, राहुल तायडे, पंकज देशमुख, सुशील हिवसे, दत्तात्रय किटुकले, शुभम सपाटे, अनिकेत जावरकर, किरण महल्ले, समीर जवंजाळ, अमर शिंगणे, अनिकेत ढेंगळे आदी मंडळी शेतकरी सन्मानाच्या विविध ठिकाणी उपस्थित होती.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण...
कोरोना विषाणू संसर्गामुळे जगामधील विविध क्षेत्र, व्यवसाय व उद्योग लॉकडाउन झाले. परंतु आमचा शेतकरी अन्नदाता लॉकडाउन झाला नाही. तो थांबला नाही. त्यामुळे त्याच्या सन्मानात खंड पडू नये व त्याच्या श्रमाचा व त्यागाचा सन्मान व्हावा यासाठी त्यांच्या शेताच्या बांधावर राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन आम्ही गौरव करीत आहोत. ही बाब आमच्या सर्व शेतकरी समाजासाठी भूषणावह आहे, असे मत आयोजक प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers awarded by Rajiv Gandhi Krushi ratna award