
ललित कनोजे
शितलवाडी : अंगातून वाफ निघावी इतकी वातावरणात धुम्मस जाणवू लागली आहे. उन्हाळ्यातील ‘नवतपा’ जाणवलाच नाही, मात्र ‘मृगतपा’ सगळ्यांनाच असह्य होत आहे. मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्याने सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीला प्रारंभ केला. मात्र, गत १२ दिवसांपासून दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मॉन्सूनचे आगमन रखडल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी थांबले आहेत.