
विनोद बोडखे
रिसोड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने या वर्षी खरीप हंगामाची तयारी केली. काही शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज, तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गाने पैसे उसनवार, कर्जाने घेऊन बी-बियाणे खतांची तयारी करत मृग नक्षत्रात पेरणी होईल अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा मात्र फोल ठरली.