Kharif Sowing : लागला जून; कुठे दडला माॅन्सून? चांगला व वेळेवर पाऊस येण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Rohini Nakshatra : नरखेड तालुक्यात अधूनमधून पावसाचा आभाव असून मृग नक्षत्रातील पावसाच्या कमी पडण्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला धोका निर्माण झाला आहे. तरीही शेतकरी धोका पत्करून कापूस आणि तूर पिकांसाठी बियाण्याची खरेदी करत आहेत.
Kharif Sowing
Kharif Sowingsakal
Updated on

जलालखेडा (ता.नरखेड) : रोहिणी नक्षत्र संपत आले असून अधूनमधून नरखेड तालुक्यात पाऊस पडला. मृग नक्षत्रात पाऊस येईल, पण खंड राहिल असा अंदाज आहे. पण, नेमका पेरणीचा पोषक काळ मृग नक्षत्र असल्याने खरीप हंगामाची पेरणी झाली नाही तर शेतकऱ्यांचे गणित बिघडण्याचा धोका शेतकरी व्यक्त करीत असला तरी शेतकरी एकदा पुन्हा धोका पत्करत पेरणीची धावपळ सुरू केली आहे. कापूस व तूर पिकाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com