Traditional Farming : शेतीची कामे कोणत्या नक्षत्रात करावीत यासाठी अनेक शेतकरी अजूनही पंचांगातील नक्षत्रांवर विश्वास ठेवतात. मॉन्सूनपूर्व पावसामुळे जमिनीत ओलावा असूनही पेरणीसाठी रोहिणी नक्षत्राची वाट पाहिली जाते.
शितलवाडी : मॉन्सूनपूर्व पावसामुळे जमिनीत ओलावा असला तरी कोणत्या नक्षत्रात शेतीची कोणती कामे करावित व पेरणी कधी धरावी, याबाबत शेतकऱ्यांचा नक्षत्रांवरच अधिक भरवसा आहे, असे जाणकार शेतकरी सांगतात.