शेतकरी जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत विकास साध्य होणार नाही : फिरके

dalimb
dalimb
Updated on

आर्वी (वर्धा) : शेतकरी जोपर्यंत एकत्र येणार नाही विकसनशील बनणार नाही तोपर्यंत स्वतःचा विकास तो साध्य करू शकणार नाही. शासनाच्या सर्व योजना आता शेतकरी गटासाठी असल्याने एकापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी गटा गटाने एकत्र येऊन फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करणे अगत्याचे झाले आहे. शासन व्यवस्था निर्माण करू शकते पण व्यवसाय करू शकत नाही ?त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला उद्योग आपला व्यवसाय करायचा आहे. शेतकरी गटाला 60 टक्के पर्यंत सबसिडी देण्यात येते हे लक्षात ठेवावे असे प्रतिपादन अर्थ व सांख्यिकी नियोजन विभागाचे उपायुक्त कृष्णा फिरके यांनी केले. 

आर्वी तालुका जैविक वस्तू संघाचे वतीने सेंद्रिय चळवळ सेंद्रिय ग्राहक उत्पादक आणि व्यापारी यांचा जनजागृती कार्यक्रम व शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन डाळिंब पुरस्कार प्राप्त शेतकरी सचिन देशमुख यांच्या डाळिंब शेतात करण्यात आले होते. या प्रसंगी या जैविक वस्तू संघाचे संस्थापक उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा तहसीलदार विजय पवार उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने प्रसिद्ध उद्योजक ज्ञानेश्वर रक्षक, काकडे नायब तहसीलदार आनंद देवकर, शेतकरी नवल किशोर अग्रवाल, मनीषा आसोले, सुभाष व्हरेकर, वाडीभस्मे प्रगतशील युवा शेतकरी किशोर बन्नगरे, नंदकिशोर दीक्षित, रितेश लुनावत राजेश सोलंकी रितेश नारले  नीलेश बंगाले आदि अनेक शेतकरी उपस्थित होते.

रासायनिक शेतीने आरोग्यावर काय परिणाम होतात हे उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांनी विशद करून केळी पपई संत्री डाळिंब आदी फळे रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या न घेता जैविक पद्धतीने पिकवलेली विकत घ्यावी यावर भर दिला या फळाची मागणी ग्राहक प्रचंड वाढलेली असून यासाठी या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ज्ञानेश्वर रक्षक यांनी आर्वी करणच्या जैविक वस्तू संघाचे अभिनंदन करून येणारी शेतकऱ्यांची पिढीही शेती उत्पादन झालीच पाहिजे शेतीतच रोजगार देण्याचे सामर्थ्य आहे, असे विशेष करून शेतीला विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज आहे असे सांगितले. विषमुक्त शेती तयार करण्यासाठी युवा पिढीने समोर येण्यासाठी तत्पर असले पाहिजे या सेंद्रिय फळ शेतीला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सेंद्रिय डाळिंब शेती करणारे शेतकरी सचिन देशमुख यांनी हजारो रुपयाची इंजिनिअरची नोकरी सोडून शेतीत लक्ष कसे घातले? रासायनिक विषयुक्त पद्धतीला फाटा देऊन गोमूत्र निंबोळी आधीपासून सेंद्रिय खते तयार करून मातीला शेतीला कसे विषमुक्त केले? याचे उदाहरण दिले शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत मालाची विक्री करून युरोपीय निकष प्रमाणपत्र या डाळिंबाला मिळाल्यावर त्यांचे डाळिंब नागपूर पुणे अमरावती दिल्ली बंगलोर गुडगाव येथे कुरियरने पाठवत असल्याचे तसेच मोठ्या शहरातील मॉलमध्ये हे फळे विक्रीस असल्याचे सांगितले. डाळिंब मित्र या पुरस्काराने त्यांना नाशिकला सन्मानित करण्यात आले. याबाबत प्रेरणादायी विस्तृत माहिती त्यांनी शेतकऱ्याला दिली आणि रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर करून शेतीला आणि मातीला विषमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com