
गडचिरोली: देसाईगंज तालुक्यातील सुपिक शेतजमिनीवर जेएसडब्ल्यू स्टिल प्लांटची उभारणी करण्याचा घाट घातला जात असून आमची सुपिक जमिन या प्रकल्पाला देऊ नका, असे साकडे बाधित परीसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदनाद्वारे घातले. यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचा संदर्भ देत सुपीक जमिन देणार नसून पर्यायी जागा शोधू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.