अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक

सुनील धुरडे
शुक्रवार, 15 मार्च 2019

दानापूर (अकोला) : येथील सर्वसामान्य शेतकरी अर्जून राऊत यांचा मुलगा मनोज हा सर्व सामान्य परिस्थीतीवर मात करत पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील विद्यार्थ्यांचा आदर्श बनला आहे.

दानापूर (अकोला) : येथील सर्वसामान्य शेतकरी अर्जून राऊत यांचा मुलगा मनोज हा सर्व सामान्य परिस्थीतीवर मात करत पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील विद्यार्थ्यांचा आदर्श बनला आहे.

दानापूर येथील मनोज अर्जुन राऊत लहानपणापासूनच शाळेत हुशार परंतू परिस्थिती हलाखीची त्यावर मात करत नवोदय परिक्षा उत्तीर्ण केली. वाशीम येथे नवोदय विद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अडचणी आल्यात आई-वडील तुटपुंज्या शेतीमध्ये एकूलत्या एक मुलासाठी रात्र दिवस कष्ट करत होते. त्यातच एक एकर असलेल्या शेतीमधील पीक साथ देत नव्हते. कधी दुष्काळ तर कधी नापीकी. अशाही परिस्थितीमध्ये मुलाला एखादा अधिकारी बनवायचे पाहलेले स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते.

मनोजने सुद्धा आईवडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहील्या प्रयत्नात मनोज अपयशी झाला परंतू हार न मानता मनोजने दुसऱ्या प्रयत्नात यशाचे शिखर सर केले. महाराष्ट्रामधून ४७ व्या मेरीट राहीला. मनोजच्या यशाबद्दल आई वडीलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याचप्रमाणे गावचा सर्वसामान्य कुटूंबातील मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यामुळे चाहत्यांकडून मनोजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशाचे श्रेय आपला आईवडीलांना देतो आहे. मनोज आपल्या अनुभवातून सांगतो काही करायचे मनात आणा मग दिशांना वाण नाही. तुम्हाला रोखू शकेल असे जगात कोणतेच तुफान नाही माझी रात्रंदिवस केलेली मेहनत परमेश्वराची कृपा व आईवडीलांचा पाठीशी असलेला आशिर्वाद यामुळेच यश संपादन करू शकलो.

Web Title: farmers son become a PSI