Farmers Protest : शेकडो शेतकरी आज दाखल करणार कर्जमाफीचे अर्ज
Crop Loan Struggle : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर, मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी एकत्र आले आहेत. किसान ब्रिगेडच्या पुढाकाराने शुक्रवारपासून न्यायालयीन लढ्यासाठी अर्ज सादर होणार आहेत.
मूर्तिजापूर : न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफी अर्ज भरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज असून, शुक्रवारी (ता.३०) शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे दाखल करण्यात येणार आहेत.