prataprao jadhav
sakal
सिंदखेड राजा - नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणारच नसण्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. सिंदखेड राजा परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे किनगांव राजा मंडळ अंतर्गत येणाऱ्या सावखेड तेजन, पळसखेड चक्का व किनगांव राजा यासह तालुक्यातील इतर भागातील १५ हजार २३३ हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.