Cotton Rate : शेतकरी चिंतेत! वाढता वाढेना कापसाचे दर

५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा कापूस घरातच
Cotton
Cottonsakal

जलालखेडा - सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात घसरण झाली आहे. कापसाच्या दरात कधी सुधारणा होणार याची शेतकऱ्यांना नित्याने प्रतीक्षा आहेच. दर कमी असल्यामुळे अद्याप ५० टक्केच्या वर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. कापूस शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे.

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांना कापसाचे पाहिजे तसे उत्पन्न होत नसून त्यातच कापसाचे भाव दिवसागणिक कमी होत असल्याने त्याचा उत्पादन खर्चही निघतो की नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या कापसाला साडेसहा ते सात हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.

कापसाच्या दरात घसरण झाल्याने सध्या नरखेड तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. आताच्या घडीला नागपूर जिल्ह्यासह तालुक्यात कापसाला सध्या सात हजार रुपयेपर्यंतचा दर मिळत आहे. मागील वर्षी हाच दर १० ते ११ हजार रुपयांवर मिळत होता.

मात्र, यावर्षी अद्यापही कापसाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवला आहे. मागील वर्षी कापशीला मिळालेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची लागवड वाढवली होती.

कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही, तर जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्ये देखील कपाशीची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे. परंतु शेतकऱ्यांना लागलेला मजुरीचा खर्च, घरात असणारे लग्न समारंभ याशिवाय मुलांचे शिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक असतानाही कापूस दर कसा वाढेल, याचीच प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

- इंद्रपाल चौधरी, शेतकरी

अतिवृष्टीमुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी चार ते पाच क्विंटल असे उत्पादन झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कपाशीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका येथील कापसाला बसला आहे. हाती आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले आहे. पुन्हा उरले सुरले पीक परतीच्या पावसामुळे वाया गेले. या फटक्यातून वाचलेल्या पिकांना देखील योग्य तो दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचे दर कधी वाढणार, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

- लोकेश काळे, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com