
प्रशांत बाबाराव धवणे (वय ३१, रा. बोरगाव) यांचा शेतीचा व्यवसाय असून त्यांच्या वडिलांच्या दोन एकर शेतीत विहिरीचे खोदकाम व बांधकाम गावातील बबन चव्हाण यांना देण्यात आले होते. त्यांनी खोदकामाच्या ठिकाणी राज बाबूलाल गोंडाने (वय २२, रा. अडगाव खुर्द, ता. नांदगावखंडेश्वर) या युवकास रखवालदार व मजूर म्हणून कामासाठी ठेवले होते.