
लोणार : पावसामुळे माती खरडून मेहकर लोणार येथील वडगाव तेजनजवळच्या रस्त्यावर आली आणि याच मातीत एक चार चाकी वाहन सलग पाचवेळा पलटले. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले. लोणार तालुक्यात २६ जूनच्या मध्यरात्री ही भीषण दुर्घटना घडली. मृतक आणि जखमी चौघेही लोणारचे आहेत. ते मेहकरवरून लोणारकडे जात होते.