Motorcycle Accident : दुचाकीच्या धडकेत दोन्ही चालकांचा मृत्यू
Accident News : मनसर रामटेक महामार्गावरील वाहिटोला येथे दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन दोन दुचाकीचालकांचा मृत्यू झाला. घायालेल्यांपैकी एकाचा नागपूरला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
शितलवाडी : मनसर रामटेक महामार्गावर वाहीटोला येथे दोन मोटरसायकलच्या समोरासमोर धडकेत दोन्ही दुचाकीचालकांचा मृत्यू झाला. ही घटना रामटेक मनसर महामार्गावरील वाहीटोला येथे गुरुवारच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.