Shelsur News : जुने घर पाडण्याचे काम करणाऱ्या दोन मजुर बापलेकाचा अंगावर घर कोसळून मृत्यू

जुने माळोदाचे घर पाडण्यासाठी काम करणाऱ्या दोन मजुरांचा घराचा वरचा भाग अचानक अंगावर कोसळून जागीच अंत झाला.
Shaligram valaskar and Yogesh Valaskar
Shaligram valaskar and Yogesh Valaskarsakal
Updated on

शेलसूर - येथून जवळच असलेल्या शेलोडी ता. चिखली येथे जुने माळोदाचे घर पाडण्यासाठी काम करणाऱ्या दोन मजुरांचा घराचा वरचा भाग अचानक अंगावर कोसळून जागीच अंत झाला.

मृतांमध्ये शालिग्राम वाळसकर व योगेश वाळसकर या बापलेकांचा समावेश असल्याने शेलोडी गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना आज १७ मार्च रोजी सकाळी ८.३० वा. दरम्यान घडली.

या दुर्घनेत जखमी झालेल्या अन्य दोघांवर चिखली येथे डॉ. जवंजाळ यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. याबाबत सविस्तर असे की, शेलोडी येथील दामोधर घाडगे यांना नवीन घर बांधायचे असल्याने जुने माळोदाचे घर पाडण्याचे काम सुरू होते.

तेथे काम करत असतांना अचानक संपूर्ण घर मजूरांच्या अंगावर कोसळले. ही घटना समजताच गावातील लोकांनी त्यांच्या अंगावर कोसळलेला मलबा हटवून त्यांना तात्काळ चिखली येथील डॉ. जवंजाळ यांच्या दवाखान्यात भरती केले.

कामावर असलेल्या चार जणांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये शालिग्राम वाळसकर (६५) व योगेश वाळसकर (३२) यांचा समावेश आहे. अन्य राम घाडगे व सुनील नेमाने यांच्यावर डॉ. जवंजाळ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com