फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा वि. सा. संघातर्फे मंगळवारी सत्कार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 November 2019

नागपूर : उस्मानाबादेत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (ता. 5) सायंकाळी सहा वाजता विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात होईल. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहतील. त्यांच्याच हस्ते फादर दिब्रिटो यांचा सत्कार करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची निवड निश्‍चित झाली.

नागपूर : उस्मानाबादेत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवारी (ता. 5) सायंकाळी सहा वाजता विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात होईल. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहतील. त्यांच्याच हस्ते फादर दिब्रिटो यांचा सत्कार करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर दिब्रिटो यांची निवड निश्‍चित झाली. विशेष म्हणजे या बैठकीला महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील घटक संस्थांसह विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्‍स
कोण आहेत फादर दिब्रिटो?
फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. "सुवार्ता' मासिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनात्मक लेखन केले. "सुबोध बायबल-नवा करार' या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला. त्यांनी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. दिब्रिटो यांचे "संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची', "आनंदाचे अंतरंग', "तेजाची पाऊले', "परिवर्तनासाठी धर्म', "ओऍसिसच्या शोधात', "सृजनाचा मळा', "नाही मी एकला', "सृजनाचा मोहोर', "गोतावळा' आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Francis Dibrito