Amravati Crime sakal
विदर्भ
Amravati Crime : मुलाच्या त्रासाला कंटाळून पित्याची टोकाची कृती; पित्यानेच केली मुलाची हत्या, वरुड तालुक्यातील बहादा येथील घटना
Crime News : वरुड तालुक्यातील बहादा गावात पित्याने मुलाच्या डोक्यात काठीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सततच्या व्यसनामुळे आणि वादामुळे वडिलांनीच मुलाचा जीव घेतला.
अमरावती : मुलाच्या त्रासाला कंटाळून पित्याने त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २) वरुड तालुक्यातील बहादा गावात घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. दिलीप हिरामण उईके (वय ३२, रा. बहादा) असे मृत मुलाचे नाव असल्याची माहिती वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी दिली.