Buldhana : मोबाईल दिला नाही म्हणून वडीलांचे फोडले डोके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 crime

मोबाईल दिला नाही म्हणून वडीलांचे फोडले डोके

देऊळगाव राजा : मोबाईल दिले नाही म्हणून वडिलांच्या डोक्यात पातेलं मारून जखमी केले याबरोबरच वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविला सदर घटना शनिवारी सायंकाळी तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथे घडलीरुस्तुम शालीकराव झिने असे आरोपी मुलाचे नाव असून शनिवारी सायंकाळी वडिलांच्या घरी जाऊन त्याने मोबाईल मागितला असता वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिला याचा राग सदर आरोपी मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी पातेलं मारून जखमी केले व आपल्या वृद्ध वडीलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला दरम्यान वडिलांना मारत असताना आई सोडविण्यासाठी मधात आली असता तिला सुद्धा आरोपी मुलाने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान (ता.२०) रात्री साडेनऊ वाजता जखमी अवस्थेत शालीकराव उत्तम झिने वय ५८ यांनी पोलिस ठाणे गाठले व आपल्या निर्दयी मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली पोलिसांनी फिर्यादी वडिलांची मेडिकल तपासणी आणि दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून रुस्तूम शालीकराव झिने वय ३४ राहणार गिरोली बुद्रुक याच्याविरुद्ध आई वडिलांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला सदर प्रकरणात पोलीस आरोपींचा शोध घेत असून बिट जमादार रवींद्र चव्हाण तपास करीत आहे

अन् पोलीस ठाण्याच्या आवारात त्यांनी काढली रात्र- मुलाने केलेल्या अत्याचाराने भयग्रस्त झालेल्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर कठोर मुलाच्या भीतीने घरी जाणे टाळले पोलिसात तक्रार नोंदविली म्हणून पुन्हा मारहाणीच्या भीतीने वृद्ध आई-वडिलांनी पोलीस ठाण्यातच झोपून रात्र काढली सकाळी पोलीस आरोपीच्या शोधात गावात पोचले मात्र आरोपी मुलाने पळ काढला

loading image
go to top