भय इथले संपत नाही!, जीर्ण इमारती ठरतायेत जीवघेण्या

Fear does not end here! akola buldna Dilapidated buildings are fatal
Fear does not end here! akola buldna Dilapidated buildings are fatal

नांदुरा (जि.बुलडाणा) : शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये गांधी चौकात भर वर्दळीच्या ठिकाणी असलेली जीर्ण झालेली तीन मजली इमारत ता.4 जुलै रोजी संध्याकाळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने संभाव्य धोका पाहून यात वास्तव करणाऱ्या नवगजे कुटुंबियांना सामाजिक कार्यकर्त्यांनी अगोदरच बाहेर काढल्याने व लॉगडाऊन असल्याने चौकात वर्दळ नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र शहरात आजही पुरातन मोठमोठ्या इमारती जीर्ण अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे "भय इथले संपत नाही...' अशी अवस्था नगरपालिकेचे दुर्लक्षामुळे होत आहे.


नांदुरा शहरात जुने गाव असलेल्या भागात आजही अनेक इमारती जीर्ण अवस्थेत शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.अशीच ध्रुव चौकातील डागा बिल्डिंग नावाने ओळखली जाणाऱ्या बिल्डिंगला तडे गेले असल्याने ही इमारत केव्हाही पडून जीवितहानीची शक्‍यता नाकारता येणारी नसल्याने दि. जूनच्या दै.सकाळच्या अंकात 'ती इमारत देत आहे मृत्यूला आमंत्रण'अशा आशयाची बातमी प्रसिद्ध करताच बिल्डिंगच्या मालकाने बातमीची दखल घेत त्याच दिवशी मजुरांकरवी ही बिल्डिंग सुरक्षितरीत्या पाडली होती.अशा जीर्ण झालेल्या अनेक इमारती आजही शहरात शेवटची घटका मोजत असतांनाही जनतेची मागणी असूनही स्थानिक प्रशासन किंवा घरमालक या इमारती पाडण्यास कानाडोळा करत असल्याने शहरातील जनता भयभीत अवस्थेत जीव मुठीत धरून या गजबजलेल्या भागातून मार्गक्रमण करीत आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

लॉकडाऊन नसता तर मोठी जीवितहानी
गांधी चौकातील खाली किराणाचे दुकान व वर नवगजे कुटुंब वास्तव करत असणारी अतिशय जीर्ण झालेली तीन मजली इमारत शनिवारी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कदाचित कोरोना नसता व त्यामुळे शहरात लॉगडाऊन नसता तर या गजबजलेल्या चौकात संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी असती व त्यामुळे मोठी जीवितहानीही होऊ शकली असती.यासाठी स्थानिक न.पा. प्रशासनाने आजही शहरात असलेल्या जुन्या जीर्ण इमारती पाडण्याची 'हीच योग्य वेळ' समजून कार्यवाही करावी अशी मागणी शहर वासीयांकडून सद्या केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com