‘ती’च्या हाती ऑटोचे स्टिअरिंग; सुखी संसाराला कोरोनाची दृष्ट

‘ती’च्या हाती ऑटोचे स्टिअरिंग; सुखी संसाराला कोरोनाची दृष्ट

नेर (जि. यवतमाळ) : कोरोनाने एक नव्हे तर हजारो कुटुंबाचे सुखी संसार उद्ध्वस्त झाले. कोरोनाच्या काळ्या आठवणींनी अनेकांची झोप आजही हरविली आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर विधवेला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दु:ख बाजूला सारत हिमतीने पुन्हा पदर खोचावा लागला. कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्याने महिलेला चक्क पुरुषाची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात ऑटोचे स्टिअरिंग हाती घ्यावे लागले आहे.

नेर तालुक्यातील परजना हे चारशे लोकसंख्या वस्ती असलेले बंजारा बहुल गाव. गावात अशोक जाधव हा तरुण ऑटो चालवून कुटुंबाचा गाडा ओढत होता. त्याच्या कुटुंबात वृद्घ आई-वडील, पत्नी, दोन मुली, तीन मुले व एक भाऊ होते. घरात जास्त पैसा-अडका नसला तरी संसार सुखाने सुरू होता. मात्र, दुसऱ्या लाटेत अशोकला कोरोनाचा संसर्ग झाला. यातच त्याने अखेरचा श्‍वास घेतला आणि अख्खे कुटुंबच उघड्यावर पडले.

‘ती’च्या हाती ऑटोचे स्टिअरिंग; सुखी संसाराला कोरोनाची दृष्ट
अकोला : शिवसेनेच्या आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादीचा नगरसेवक निलंबित

पतीच्या निधनानंतर कुटुंबाचे कसे होणार, या चिंतेने अरुणा जाधव हिला ग्रासले. काही दिवस अश्रूचे घोट पीत असताना पती करीत असलेला ऑटो व्यवसाय करण्याचा निश्‍चय तिने केला. पती असताना अरुणा मजुरीचे काम करायची. मात्र, मुलांना शिकवून मोठे अधिकारी करण्याचा ध्यास तिने घेतला आहे. अरुणा जाधव हिने आत्मनिर्भर होत ऑटोरिक्षा चालविण्याचे काम सुरू केले आहे.

परजना गावातून अडगाव, शिरजगाव, अजंती, नेर, कारंजा अशा ठिकाणी ती रिक्षा चालवत प्रवाशांना सोडते. तसेच मजुरांना शेतातून ने-आण करते. शेतकऱ्यांचे खत शेतात पोहोचविणे, दुकानदारांचा भाजीपाला आणणे असे कामे ती रिक्षाच्या माध्यमातून करते. डिझेल खर्च वगळून दोनशे रुपये दिवसाला तिच्या पदरात पडतात.

अरुणा हिला पाच मुले असून मोठी मुलगी अमृता आठवीत, अर्पिता पाचवीत, यश चौथीत, उत्कर्ष सहावी तर लहान आदर्श अंगणवाडीत जातो. काहीही करून मुलांना चांगले शिक्षण द्यायचे. शिक्षक, पोलिस, अधिकारी बनवायचे हे तिचे स्वप्न आहे. आपल्यावर जी परिस्थिती आली ती मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी तिचा खटाटोप सुरू आहे.

‘ती’च्या हाती ऑटोचे स्टिअरिंग; सुखी संसाराला कोरोनाची दृष्ट
अनिल परब यांनी चौकशीसाठी जायला हवे होते
कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. ऑटो चालवून उदरनिर्वाह करीत आहे. त्यात केवळ दिवसाला दोनशे रुपये हाती पडतात. मुलांनी शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे, अशी इच्छा आहे. शासनाने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्यास दिलासा मिळेल.
- अरुणा जाधव, ऑटोचालक महिला, परजना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com