गोंडपिपरी : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शालेय पोषण आहाराची व्यवस्था करण्यात येते. पण काही ठिकाणी ही यंत्रणा सांभाळणारेच शालेय पोषण आहाराच्या साहित्याची चोरी करतात.असाच एक प्रकार रविवार (ता. १) तालुक्यातील खराळपेठ येथे उघडकीस आला. .सायंकाळी शाळेच्या बाहेर शालेय पोषण आहाराच्या साहित्याने भरलेले पोते आढळले. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच गावकरी एकत्र आले. शालेय पोषण आहार विभागात काम करीत असलेल्या महिला स्वयंपाकीने हा प्रकार केल्याचे लक्षात आले..ग्रामस्थांनी तातडीने गोंडपिपरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखलही झाले. शेवटी स्वयंपाकी वैशाली पेंदोर यांनी आपणच हा प्रकार केल्याची कबुली देत माफी मागितली. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, गावकऱ्यांचा संताप लक्षात घेता तातडीने स्वयंपाकीनला पदावरून हटविण्यात आले..खराळपेठ येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे.या शाळेत शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहाराची व्यवस्था करण्यात येते. या शाळेत वैशाली पेंदोर या स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास शाळेच्या बाहेर तांदळाचे दोन कट्टे दिसून आले. शाळा व्यवस्थापन समितीचे रवींद्र बांगरे यांना हा प्रकार लक्षात आला..त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेत शाळेचे मुख्याध्यापक मडावी यांना बोलाविले. तातडीने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक बोलविण्यात आले. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान शालेय पोषण आहार चोरण्याचा हा प्रयत्न गावकऱ्यांनी हाणून पाडला. स्वयंपाकीन वैशाली पेंदोर यांनी माफी मागितली. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आता नवीन महिला स्वयंपाकीची नियुक्ती करण्यात आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.