महिला वन कर्मचाऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमूर : महिला वन कर्मचाऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु

चिमूर : महिला वन कर्मचाऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु

चिमूर तालुक्यातील कोलारा कोअर वनक्षेत्रातील वाघाई पानवटा क्रमांक ९७ येथे महिला वन रक्षक स्वाती नानाजी ढुमने वय ३२ वर्ष ह्या सकाळी ८.३० च्या दरम्यान ट्रॅन्सेक्ट लाईनची काम करीत असताना वाघाच्या हल्यात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

कोलारा वनपरीक्षेत्र कार्यालय(कोअर) येथे कार्यरत महिला वन रक्षक स्वाती ढुमने ह्या तिन सहकारी वनरक्षकासह वन क्षेत्रात आज २० नोहेम्बंर पासुन सुरु होणाऱ्या ट्रन्सेक्ट लाईनचे काम करण्या करीता गेले. कोलारा गेट पासुन जवळपास ९ किलो मिटर अंतरावर असलेल्या जंगल क्षेत्रातील वाघाई चौरस्त्या नजीक पाणवठा क्रमांक ९७ जवळ काम करीत असलेल्या वन रक्षक स्वाती ढुमने यांचेवर अचानक हल्ला केला.

सहकाऱ्याना समजण्या पुर्वीच फरफटत नेले.यात महिला वन रक्षकाचा जागेवरच मृत्यु झाला. याची माहीती वरिष्ठाना देण्यात आली.यानंतर मृतक वन रक्षकाच्या प्रेताचा शोध घेण्यात आला. प्रेत मिळाले असुन पंचनामा करून उत्तरीय तपासणी करीता उप जिल्हा रुग्णांलय चिमूर येथे पाठविण्यात आले.घटना स्थळावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक रामगावकर, उपसंचालक (कोअर) एन. व्हि.काळे,सहाय्यक वन सरंक्षक एम .व्हि. खोरे , ताडोबा वन परीक्षेत्र अधिकारी एस. के. शेन्डे इत्यादी वन अधिकारी घटना स्थळावर पोहचुन पाहणी केली.

loading image
go to top