Tiger Capture : महिलेला मारणारी ‘ती’ वाघीण अखेर जेरबंद; वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश, गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलविले
Forest Department : शिवरामटोला येथे मोहफुले संकलन करत असलेल्या महिलेला वाघाने ठार केल्यावर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने वाघीण जेरबंद केली. या वाघीणाला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलविण्यात आले.
नवेगावबांध (जि. गोंदिया) : शिवरामटोला येथे मोहफुले संकलन करीत असलेल्या महिलेला वाघाने ठार केले होते. या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सदर वाघ मादी असून, वय अंदाजे दोन वर्षाचे आहे. अशी माहिती वनविभागाने दिली.