पंधरा दिवसात आढळले 3,852 संशयित कुष्ठरुग्ण 

रूपेश खैरी 
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

वर्धा : देशातील कुष्ठरुग्णांची संख्या शून्यावर आणण्याकरिता शासनाच्या वतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. हा शून्य गाठण्याकरिता राज्यात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली. पंधरा दिवस राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल तीन हजार 852 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. एवढी संख्या असल्याने संशयित रुग्णांची येथील कुष्ठरोग विभागात तपासणी करण्यात येत आहे. यापैकी दोन हजार 64 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यातून 76 नवे रुग्ण मिळून आले आहेत. 

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत शहरी आणि ग्रामीण भागात तब्बल 12 लाख 93 हजार 720 रुग्णांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही गटातील नागरिकांचा समावेश आहे. ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी 12 लाख 37 हजार 517 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीतून संशयित रुग्ण आढळून आले आहे. 
13 ते 28 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत संशयित रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक असल्याचे दिसून आले आहे. या मोहिमेत शहरी भागात झालेल्या सर्वेक्षणात दोन लाख 27 हजार 397 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात 471 जण संशयित असल्याचे दिसून आले आहे. या 471 जणांची तपासणी केली असता तब्बल दहा जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या तुलनेत ग्रामीण भागात 10 लाख 10 हजार 120 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात तीन हजार 381 जण संशयित असल्याचे दिसून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्यापैकी 56 जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the fifteen days 3,852 suspected lepers were found

टॅग्स