एकाच दिवसात शेतकऱ्यांना बावन लाखांचे पीककर्ज

बट्टे यांच्या प्रभावी नियोजनाने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले
Crop loan
Crop loanSakal

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शेतीचा हंगाम सूरू होण्यावर आहे. अशावेळी बळीराजाला पिककर्जाचा मोठा आधार मिळतो. पण हे कर्ज मिळविण्यासाठी बरीच मश्शखत करावी लागते. कागदपत्रांची जुळवाजुळव, सचिवांशी समन्वय यात त्यांचे अनेक दिवस जातात. अशावेळी गोंडपिपरी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बट्टे यांनी अतीशय प्रभावी नियोजन केले. शेतकऱ्यांशी व बँकेशी समन्वय साधत केवळ एका दिवसात 73 शेतकऱ्यांना बावन लाख रूपयाचे पिककर्ज मिळवून दिले. यामुळ येऊ घातलेल्या हंगामात त्यांना शेतीचे नियोजन करण्यात मोठी मदत मिळणार आहे. बट्टे यांच्या प्रभावी नियोजनाने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.दरवर्षीच बळीराजा मोठ्या आशेने शेती करतो पण शेतीचे सरासरी उत्पन्न कमी होत असल्याने बैलबट्टा बरोबर होत असतो. अशावेळी शेतीच्या हंगामात गूंतवणुक करण्यासाठी पिककर्ज हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असतो. पण पिककर्ज मिळवितांना शेतकरी बांधवांना मोठी कसरत करावी लागते. अनेक कागदपत्रांची जुळवाजूळव, सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाशी समन्वय, थकीत कर्ज असल्यास त्याचा भरणा करणे बँकेशी संबधीत अशा अनेक प्रकियेतून त्यांना जावे लागते.

या कामांमुळ त्यांचे अनेक दिवस जातात.परिणामी कधिकधी हंगाम सुरू झाल्यानंतर बर्याच दिवसांनी शेतकऱ्यांना पिककर्ज मिळते.यामुळ शेतीचे नियोजन बिघडून त्यांना मोठा फटका बसतो. दरवर्षी तोच तो प्रकार होत असल्याने शेतकरी बांधवांना अनेक अडचणी यायच्या. शेतकरी बांधवांना अगदी सहजपणे पिककर्ज कसे देता येईल यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बट्टे यांनी नियोजन करण्याचे ठरविले.त्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेतल्या,चर्चा केली.जिल्हा मध्यवर्ती बँक गोंडपिपरीचे व्यवस्थापक डि.जे.कालर,संस्थेचे सचिव संदीप रामगिरकार यांच्याशी प्रभावी समन्वय साधला.

अन शेवटी एकाच दिवसात सारी प्रक्रिया पार पाडीत 73 शेतकरी बांधवांना 52 लाख रूपयाचे पिककर्ज वितरित करण्यात आले. केवळ एका दिवसात पिककर्ज मिळाल्याने शेतकरी बांधव जाम खूष झाले. देवेंद्र बट्टे यांच्या प्रभावी नियोजनामुळ गोंडपिपरीतील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून ते शेतीच्या हंगामासाठी सज्ज झाले आहैत.

अनेक दिवस कागदपत्रांसाठी जुळवाजुळव, त्यानंतरची प्रशासकीय अनास्था यामुळ हंगाम सूरू झाल्यानंतर पिककर्ज मिळाल्याने अनेकांच्या शेतीचे नियोजन बिघडल्याचे आपण जवळून बघितले.सेवा सहकारी संस्थेची सुत्र हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण बँक,शेतकरी बांधवाशी समन्वय साधला.यामाध्यमातून केवळ एकाच दिवसात 73 शेतकरी बाःधवांना 52 लाख रूपयाचे पिककर्ज मिळाले आहे.

- देवेंद्र बट्टे, अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था गोंडपिपरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com