Hinjewadi crime
Hinjewadi crime

Amaravati Crime: दोन गट समोरासमोर भिडल्याने राडा, दोघे जखमी; गोळीबाराची अफवा

Published on

Latest Amravati News: शहरातील नागपुरीगेटहद्दीत दोनगट समोरासमोर उभे ठाकल्यामुळे रविवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास राडा झाला. झटापटीत दोन्ही गटातील दोघे जखमी आहे.

रविवारी दोन गट समोरासमोर उभे ठाकले. त्यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर वादविवाद होऊन झटापट झाली. त्यात दोघे जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त पोलिस कुमक घटनास्थळी दाखल करण्यात आली. दोन्ही गट तक्रार दाखल करण्यासाठी नागपुरीगेट ठाण्यात पोहचले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याबाबत तातडीने दखल घेऊन दोन्ही गटाचे मत ऐकून घेतले. सायंकाळपर्यंत एकमेकांनी परस्परांवर गोळ्या झाडल्याचा आरोप तक्रारीत केला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com