कोराडीत देवी मिरवणुकीदरम्यान हाणामारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर :  नागपुरातील नामांकित कोराडी देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांना मारहाण केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. ही घटना गुरुवारी (ता.10) रात्री साडेदहा वाजता कोराडीत घडली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

नागपूर :  नागपुरातील नामांकित कोराडी देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांना मारहाण केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. ही घटना गुरुवारी (ता.10) रात्री साडेदहा वाजता कोराडीत घडली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाराव श्रीराम पंडित आणि दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोरेश्‍वर वऱ्हाडकर यांनी विद्यानगरात सार्वजनिक देवीची स्थापना केली होती. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढणे सुरू होते. कोराडीतील गायकवाड ट्रेडर्समागे सिंडीकेट बॅंकेजवळील रस्ता मिरवणुकीमुळे जाम झाला होता. वाहनचालक वाहने थांबवून देवीची मिरवणूक जाण्याची वाट पाहत होते. मोठी गर्दी झाल्यामुळे रस्ता जवळपास दोन तास मोकळा होणार नव्हता. त्यामुळे वाहनचालकांनी आरडाओरड सुरू केली. दरम्यान आरोपी रणधीर चव्हाण व रंजीत चव्हाण कारमधून खाली उतरला. त्याने एका बाजूने वाहने काढण्यासाठी रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता मोकळा करण्यास त्याला मज्जाव केल्याने वाद झाला. दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोरेश्‍वर वऱ्हाडकर, सदस्य गोपाळ कळंबे, प्रकाश नाखले यांच्यासह काही कार्यकर्ते तेथे आले. त्यामुळे आरोपी अभिजीत चव्हाण आणि बसंत चव्हाण यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वाद घातला. आरोपी चव्हाण याने बाबाराव पंडित आणि अन्य काही कार्यकर्त्यांवर फरशी आणि काठीने हल्ला केला. कार्यकर्त्यांनीसुद्धा हल्ला परतवून लावला. झालेल्या हाणामारीत बाबाराव गंभीर जखमी तर काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. आरोपींनाही बराच मार लागला. पोलिसांनी चौकशी करीत चारही आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fighting between mobs During the procession of goddess in the Koradi