Gram Panchayat : ग्राम पंचायतमधील फाईली व प्रिंटर विहिरीत टाकले
Police Investigation : बुलडाण्यातील फुली ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाच्या फाईली आणि प्रिंटर अज्ञात व्यक्तीने चोरून विहिरीत फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मोताळा (जि. बुलडाणा) : फुली ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजाच्या फाईली व प्रिंटर लंपास करून विहिरीत टाकल्याची घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी सव्वासात वाजता उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.