esakal | ‘त्या’ प्रतिंबंधित परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी अंतिम टप्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Pahani.jpg

कोरोना विषाणू संसर्ग झालेले रुग्ण आढलेल्या अकोल्यातील दोन परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहे. तीन दिवसांपासून तपासणीचे काम सुरू असून हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

‘त्या’ प्रतिंबंधित परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी अंतिम टप्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगपालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सहा झाली आहे. त्यामुळे रुग्ण आढळलेल्या बैदपुरा व अकोट फैल परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात महानगरपालिकेतर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दोन्ही क्षेत्रात आतापर्यंत आठ हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.

अशी केली नागरिकांची तपासणी
बैदपूरा भागात 3054 कुटुंबांमधील 15 हजार 270 व्यक्तींची तपासणी करावयाची आहे. त्यापैकी शुक्रवार अखेर 2528 कुटुंबांमधील 12 हजार 240 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता 526 कुटुंबांमधील 3030 व्यक्तींची तपासणी बाकी आहे. अकोट फैल भागात 5400 कुटुंबांमधील 27 हजार 425 सदस्यांची तपासणी करावयाची आहे. त्यापैकी 4288 कुटुंबांमधील 21 हजार 786 जणांची तपासणी पूर्ण झाली असून, 1112 कुटुंबांमधील 5639 जणांची तपासणी अद्याप बाकी आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
आरोग्य तापसणासाठी येणाऱ्या मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी गैरसमजातून तपासणीस मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे रुग्ण तपासणीच्या कामात अडथळा निर्माण झाला. नागरिकांच्या भल्यासाठीच आरोग्य तपासणी केली जात असल्याने त्याला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नगरसेवकांची घेतली जात आहे मदत
बैदपुरा आणि अकोट फैल परिसर मुस्लिम बहूल असल्याने येथे नागरिकांची तपासणी करताना अनेक गैरसमज पसरविले जात आहे. काही ठिकाणी एनआरसीची नोंदणी केली जात असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्यामुळे या परिसरातील प्रमुख नगरसेवकांची मदत घेवून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.


गैरसमजातून काही युवकांकडून मज्जाव
गैरसमजातून काही युवकांनी मनपा पथकातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालतला होता. त्यांची समजूत काढली आहे. यापुढे कुठेही नागरिकांची तपासणी करताना अडचण येणार नाही. नागरिकांनीही त्यांच्या भल्यासाठी घरात थाबांवे म्हणून आवाहन करतो आहे. सोशल मीडियातूनही आवाहन केले आहे. आवश्‍यक तेथे स्वतः जाणून पथकांना मदत करीत आहो. नागरिकांना सुविधा मिळेल याकडेही लक्ष दिले जात आहे. प्रशासनाने धन्यधान्याची व्यवस्था गरीब कुटुंबासाठी करावी.
- साजिद खान पठाण, विरोधी पक्ष नेते, महानगरपालिका


नागरिकांच्या भल्यासाठीच आरोग्य तपासणी
संपूर्ण काळजी घेतल्यानंतरही काही परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी ही मनपाने त्यांच्याच भल्यासाठी सुरू केली आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे यासाठी मनपा पथकातील कर्मचाऱ्यांसोबत आवश्‍यक तेथे मी स्वतः फिरत आहे.
- डॉ. झिशान हुसेन, नगरसेवक