अखेर बगाजी सागर "ओव्हर फ्लो'; 90 घनमीटर पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडलेल्या तालुक्‍यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्प बगाजी सागर धरणाचे 31 दरवाजे 3 सेंमीने उघडण्यात आले. यातून 90 घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विशेष म्हणजे, या धरणावरून आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या लष्करी डेपोला पाणीपुरवठा करण्यात येतो. सोमवारला (ता. 16) रात्रीच्या वेळी या धरणावर लायटिंग लावण्यात आल्याने सुंदर देखावा दिसत होता. तर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे.

ऊर्ध्व वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडण्यात आल्याने निम्न धरण वर्धा "ओव्हर फ्लो' झाले आहे. आता बगाजी सागर धरण पूर्ण भरल्याने पावसाळ्याच्या शेवटी भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
धामणगावशहरासह परिसरातील गावाला बगाजी सागर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणाची पाणी साठवण क्षमता 283.80 दलघमी आहे. धरणक्षेत्रातील वरच्या भागात पाणी आले; अथवा पाऊस पाऊस, धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते. आता पावसाने निम्न वर्धा धरण 100 टक्के भरले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यंदा तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र धामणगावकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाही.
धामणगावची भागणार तहान
निम्न वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जॅकवेलद्वारे पिंपळखुटा गावाजवळील नदी पात्रातून धामणगाव शहराला पाणीपुरवठा होतो. ऐन उन्हाळ्यात व दुष्काळी परिस्थिती असतानाही निम्न वर्धा धरणामुळे तहान भागविली गेली. यावर्षी सप्टेंबरमध्ये धरण 100 टक्के भरल्याने नागरिकांची वर्षभर तहान भागवली जाणार आहे.
पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी गर्दी
बगाजी सागर धरणाच्या 33 दरवाज्यामधून पाण्याचा विसर्ग पाण्यासाठी मंगळवारला (ता. 17) नागरिकांनी लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी पाण्याचा विसर्ग कॅमेऱ्यात कैद केला तर काहींना सेल्फीचा मोह आवरता आला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, the Bagaji Sea "over flow"; 90 cubic meters of water per second