Video: अखेर पोलिसांनी डागली कारवाईची तोफ, बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

जिल्ह्यात कोरोना व्हायरसने सर्वांची धडकी भरली असून, ताळेबंदीमुळे कुणीही बाहेर निघणे टाळत आहे. प्रशासन कोरोना बंदोबस्त आणि इतर प्रशासकीय कामात लागले आहे. याचाच फायदा घेत वाळू माफियांनी संधी साधू वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली होती.

 

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना व्हायरसने सर्वांची धडकी भरली असून, ताळेबंदीमुळे कुणीही बाहेर निघणे टाळत आहे. प्रशासन कोरोना बंदोबस्त आणि इतर प्रशासकीय कामात लागले आहे. याचाच फायदा घेत वाळू माफियांनी संधी साधू वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली होती.

घाटावर एलसीबीने वाळू माफियांचे मुक्से आवळल्यानंतर घाटाखालील परिस्थितीबाबत सकाळ ने पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे लक्ष वेधले होते. यावर पूर्णा काठच्या पोलिस स्टेशन दखल घेत कारवाईची सुरवात केली. दरम्यान, जळगाव जामोद पोलिसांनी आज (ता. 19) 21 लाख 90 हजारांचा वाळू साठा जप्त केला आहे. 

जळगाव जामोद तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करीचे प्रकार सुरू होते. यापूर्वी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर पोलिसांनी कारवाईसुद्धा केली होती. दरम्यान, कोरोना संकट उभे राहिल्यामुळे पोलिस प्रशासन त्या बंदोबस्तात व्यस्त झाले. परंतु, खर्‍या अर्थाने महसूल विभागाचे काम असलेल्या या कामाकडे त्यांच्याकडून सातत्याने दुर्लक्ष होत गेले आहे. आज (ता.19) जळगाव जामोद पेालिस निरीक्षक सुनील जाधव यांना वाळू साठा असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. यावेळी त्यांनी पूर्णा नदीच्या कडेला असलेल्या गोडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात वाळू असल्याचे निदर्शनास आले. परिसरात वाळू तस्करांनी वेगवेगळ्या 10 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळूची साठवणूक केल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत पीएसआय श्री. वाकडे, पोलिस नाईक राजू टेकाडे, पोलिस शिपाई गणेश पाटील, सचिन राजपूत, प्रवीण जाधव यांनी याबाबत कारवाई केली. शिवारात आढळलेली एकूण वाळू ही 730 ब्रॉसच्या घरात असून, बाजार भावानुसार आज वाळूची किंमत ही 21 लाख 90 हजारांच्या घरात आहे.  
 

सकाळने केला होता पाठपुरावा
वाळू तस्करीच्या माध्यमातून शासनाच्या कोट्यवधी गौणखनिज चोरु चुना लावण्याचे काम वाळू माफियांकडून होत राहिले आहे. याबाबत सातत्याने सकाळने पाठपुरावा केला. एलसीबी पथकाने अंढेरा पोलिस स्टेशनअंतर्गत कारवाई केल्यानंतर घाटाखाली लक्ष वेधले होते. याबाबत दखल घेत एलसीबीने तर नव्हे परंतु, स्थानिक पोलिसांनी वाळूचा मोठा साठा जप्त केल्यामुळे त्यांचे कौतुक होत असून, रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणर्‍या वाहनांवर ते कधी कारवाई करतात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
 

महसूल प्रशासन अनभिज्ञ
वाळू तस्करीबाबत गस्ती पथक तसेच इतर माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी महसूल प्रशासन का धजावले नाही हे आता कोडे बनले असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर वाळू साठा आढळला. त्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. परंतु, महसूल प्रशासनाला का माहिती मिळाली नाही असा सवाल उपस्थित होत असून, यामधील कोडे काय याचा शोध वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally buldana police confiscated the cannon and illegally stored sand worth Rs 21 lakh