कोरपना नगरपंचायत निवडणूक तापली; दोन गटात हाणामारी, १७ जणांवर गुन्हे दाखल

सिद्धार्थ गोसावी
Saturday, 21 November 2020

नगर पंचायतच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नंदा बावणे यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा नितीन बावणे यांना मारहाण केली. त्यावेळी बचावासाठी गेलेल्या सुनील बावणे आणि विजय बावणे यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोरपना  ( जि. चंद्रपूर ) :  कोरपना नगरपंचायतची निवडणूक येत्या काही दिवसांत होऊ घातली आहे. निवडणुकीपूर्वी  समाज माध्यमांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून तब्बल 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

हेही वाचा - ग्राहकांनो, तुमच्या घरी येणारे 'आरओ'चे पाणी कायमचे बंद होण्याची शक्यता,...

मोहम्मद सत्तार खान पठाण यांनी कोरपना नगरपंचायतीबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे स्वीकृत सदस्य विजय बावणे आणि मोहम्मद सत्तार खान पठाण यांच्यात भ्रमणध्वनीवरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर मोहम्मद सत्तार यांनी आपणास घरी येऊन काही लोकांनी मारहाण केल्याची तक्रार कोरपना पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून विजय बावणे, नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मनोहर चन्ने, स्वप्नील गाभणे, पियुष कावळे आदी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरीकडे नंदा बावणे यांनाही काही लोकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मोहम्मद सत्तार, आबिद अली, नगर पंचायत सदस्य सोहेल अल्ली शारीक, मौसीम अली, नगरसेवक अमोल आसेकर, अरविंद डोहे, नितीन भास्कर मुसळे, शाहबाज आसीफ अली, अमोल टोंगे, प्रमोद घोटेकर, अतुल आसेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - जावरा ते वरुडा परिसरात दोन बिबट्यांचा संचार; मेसेज...

नगर पंचायतच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नंदा बावणे यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा नितीन बावणे यांना मारहाण केली. त्यावेळी बचावासाठी गेलेल्या सुनील बावणे आणि विजय बावणे यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR filed against 17 people in dispute of two groups in korpana of chandrapur