Arvi Fire Incident : महावितरणच्या आर्वी येथील पारेषण केंद्रात रोहित्रांना आग
Mahavitaran : महावितरणच्या आर्वी येथील पारेषण केंद्रात बुधवारी झालेल्या आगीनं तीन रोहित्रे जळून खाक झाली. यामुळे साडे सात कोटी रुपयांचे नुकसान झालं आणि शहर तीन तास अंधारात होते.
आर्वी, (जि. वर्धा) : बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास महावितरण कंपनीच्या १३२ केव्ही पारेषण केंद्रामधील तीन रोहित्रे आगीत जळून खाक झाले. यात अंदाजे साडे सात कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.