
कामठी : गादा येथील युईल इन्व्हरटेक प्रायव्हेट लिमिटेड रबर कंपनीत शॉर्टसर्किटने आग लागली ही घटना मंगळवारी (ता.२०) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून ५० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.