
खापा (ता. सावनेर) : नंदापूर गावात पहिल्यांदाच बस दाखल होताच गावकऱ्यांच्या आनंदाला पार उरला नाही. ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी फुलांनी बसचे स्वागत करत पूजन केले, तर चालक आणि वाहक यांचा सत्कार करीत आनंद व्यक्त केला. त्या दिवशी गावात दिवाळीच साजरी झाली म्हणाना.