स्तर निश्‍चिती की प्रथम सत्रांत 

मंगेश गोमासे
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नागपूर : नागपूर विभागाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये "प्रथम' संस्थेच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाची आकलनशक्ती जाणून घेण्यासाठी (स्तर निश्‍चिती) 9 ते 12 ऑक्‍टोबरदरम्यान चाचणी घेण्याचे विभागीय आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले. मात्र, स्तर निश्‍चितीसाठी शाळांकडून चाचणी घेतल्यानंतर माहिती भरणे आणि त्याची तपासणी करण्यातच वेळ जाणार असल्याने शाळांनी प्रथम सत्रांत घ्यायची केव्हा असा प्रश्‍न आता शाळांमधील शिक्षकांसमोर उभा झाला आहे. 

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार विभागातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्तर निश्‍चित करण्यासाठी प्रथम संस्थेच्या सहकार्याने चाचणी घेण्याचे ठरविले. चाचणी घेतल्यावर त्याचे गुण केंद्रप्रमुखांनी संबंधित वर्गशिक्षकांकडून दिलेल्या "मोबाईल ऍप' मध्ये 12 ऑक्‍टोबरपर्यंत भरून घ्यायचे आहे. यानंतर 14 ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान तालुक्‍यात नेमलेल्या बीआरपी नी प्रत्येकी 3 शाळांमध्ये जाऊन घेतलेल्या चाचणीचे व्हेरिफिकेशन करून "मोबाईल ऍप'मध्ये माहिती भरायची आहे. ब्लॉक रिसोर्स पर्सनने (BRP) केलेल्या व्हेरिफिकेशन नंतर जिल्ह्यात नेमलेल्या डिस्ट्रिक्‍ट रिसोर्स पर्सनकडून (DRP) पुन्हा तपासण्यात येईल. यानंतर ही माहिती "मोबाईल ऍप'मध्ये माहिती भरण्यात येणार आहे. चाचणीच्या वेळापत्रकामुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकलित चाचणी (प्रथम सत्रांत) घ्यायला वेळच उरत नसल्याचे चित्र आहे. शाळेने मूलभूत चाचणी घ्यायची की संकलित चाचणी घ्यायची असा प्रश्‍न शाळांना पडला आहे. दरम्यान, दसरा व धम्मचक्र प्रवर्तनदिन तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणामुळे 20 तारखेपर्यंत फक्त सहा ते सात दिवस शाळा राहणार आहे. त्यानंतर जवळपास 24 तारखेपासून दिवाळीच्या पंधरा दिवस शाळांना सुट्या देण्यात येईल. त्यामुळे शिक्षकांना मूलभूत चाचणी व संकलित चाचणी घेण्यासाठी धावपळ होणार असून शिक्षक विद्यार्थ्यांना खरेच न्याय देऊ शकेल काय याबद्दल शंका उपस्थित होत आहे. 
शाळांमध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या प्रथम सत्रातील संकलित चाचणी दिवाळी सुट्यापूर्वी घेणे आवश्‍यक आहे. मूलभूत क्षमता चाचणीबाबत जिल्हा परिषदेकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत त्यामुळे प्रथम सत्रात मूलभूत क्षमता चाचणीचे आयोजन शक्‍य नाही.' 
- शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना, नागपू
र 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the first session of level determination