पोलिसांचा आत्मविश्‍वास वाढविणारा "तंदुरुस्त बंदोबस्त'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक दिलीप साळुंखे आणि मंडळाचे अध्यक्ष नीलेश खाडे उपस्थित होते.

नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक दिलीप साळुंखे आणि मंडळाचे अध्यक्ष नीलेश खाडे उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून "सकाळ'च्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून पोलिस बांधवांच्या आरोग्याशी संबंधित असलेला "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. आज बुधवारी सायंकाळी सात वाजता नरेंद्र नगरातील निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बेलतरोडी पोलिस ठाण्यातील तसेच डीसीपी कार्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांचा रोपटे, फळे आणि पौष्टिक चिक्‍कीचे वाटप करण्यात आले. तसेच बंदोबस्तात तैनात असताना आरोग्याप्रती सजग राहण्याचा मोलाचा सल्लाही यावेळी देण्यात आला.
पोलिसांवरील जबाबदाऱ्यांची जाणीव समाजातील अनेक सजग लोकांना होत आहे. त्याची जाणीव "सकाळ' वृत्तपत्र समूहाला आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. गणेशोत्सवात पोलिसांवर असलेला ताण लक्षात घेऊन त्यांना पौष्टिक आहार देण्यात येत आहे.
- विजय तलवारे, ठाणेदार, बेलतरोडी.

दिवसरात्र कर्तव्य बजावताना मानसिक व भावनिक साद देणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे नवी ऊर्जा मिळाली. पोलिस कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलला आहे. या उपक्रमामुळे समाजात चांगला संदेश जाईल.
-दिलीप साळुंखे, पोलिस निरीक्षक

पोलिसांवरील जबाबदाऱ्यांची जाणीव समाजातील अनेक सजग लोकांना होत आहे. त्याची जाणीव "सकाळ' वृत्तपत्र समुहाला होत आहे. ही बाब अतंत्य महत्वाची आहे. गणेशोत्सवात पोलिसांवर असलेला ताण लक्षात घेऊन त्यांना तंदुरुस्तीसाठी उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
-श्रद्धा पाटील आणि उषा आडोळे (पोलिस कर्मचारी)

"सकाळ'चे आभार
गणेशोत्सवांत पोलिसांची विशेष दखल घेतली जात असल्याने पोलिसांतच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांतही समाधानाचे वातावरण आहे. आमच्या गणेशोत्सवात उपक्रम राबविल्याबद्दल सकाळचे आभार. निसर्ग संगोपनासाठी हातभार लावणाऱ्या बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन.

-नीलेश खाडे, निसर्ग संवर्धन गणेशोत्सव मंडळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fitness mantra enhances police confidence