Crime News : बुलडाण्यातून मांडूळ विक्रीसाठी आणणाऱ्या पाच जणांच्या टोळीला छत्रपती संभाजीनगरात अटक करण्यात आली. पोलिसांनी ११.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
छत्रपती संभाजीनगर : बुलडाणा जिल्ह्यात येथे मांडूळ विक्रीसाठी आणलेल्या एका पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखा आणि वनपरिक्षेत्र पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. १२) रात्री साडेदहा वाजता शहरातील चिकलठाणा परिसरात करण्यात आली.