
एकूण 16 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 1163 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमरावती : कोरोनाचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतोच आहे. अमरावती जिल्ह्यातही आता कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढला आह. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. आदिवासीबहुल भाग असलेल्या धारणी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या तब्बल पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
या सोबतच एकूण 16 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 1163 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या पॉझिटिव्ह अहवालात धारणी येथील क्वारंटाइन सेंटर मधील , 43, 32 व 28 वर्षीय पुरुष तसेच 35 व 18 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सोबतच चिलम छावणी रस्ता येथील 47 वर्षीय महिला, जेल क्वार्टर येथील 22 वर्षीय महिला, भाजीबाजारातील 48 वर्षीय पुरुष, नवजीवन कॉलनी येथील 30 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिला, वरुड येथील 27 वर्षीय महिला, वॉलकट कम्पौंड येथील 21 वर्षीय युवती, एकवीरानगर येथील 48 वर्षीय पुरुष, खोलापुरी गेट भागातील 30 वर्षीय पुरुष, पीडीएमसीच्या इंटर्न हॉस्टेल मधील 24 वर्षीय पुरुष व एका 24 वर्षीय महिलेचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला. संबंधित 24 वर्षीय महिला कुठे राहणारी आहे, याचा स्पष्ट उल्लेख अहवालात नाही. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 163 वर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून दर शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. दोन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे.
संपादन - स्वाती हुद्दार