Chimur News : घोडाझरी तलावात बुडून पाच मित्रांचा मृत्यू झाल्यानंतर साठगाव-कोलारी येथे त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात हळहळ व्यक्त होत आहे.
चिमूर- शंकरपूर : होळी साजरी करण्यासाठी गावात आलेले सहा मित्र शनिवारी घोडाझरी तलावात पर्यटनासाठी गेले. तलावात पोहताना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाच मित्रांना जलसमाधी मिळाली.