Road Accident: पिकअप व्हॅन पलटी; मध्य प्रदेशातील पाच महिला मजूर जखमी, अपघाताचे कारण वाहतूक कोंडी
Accident News: मोर्शीपासून पाच किलोमीटर अंतरावर तळणी फाट्याजवळ मजूरांना घेऊन जाणारे वाहन पलटी होऊन पाच महिला मजूर जखमी झाल्या. हे सर्व मजूर मध्य प्रदेश येथून मोर्शी परिसरात काम करण्यासाठी येत असतात.
मोर्शी : मोर्शीपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या तळणी फाट्याजवळ मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी झाले. या अपघातात पाच महिला मजूर जखमी झाले. हे सर्व मजूर मध्य प्रदेश येथून मजुरी करण्याकरिता मोर्शी परिसरात येत असतात.