गांगलवाडी येथे पाच लाखांची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

ब्रह्मपुरी(चंद्रपूर) : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर विविध ठिकाणी स्थायी निगराणी पथक नेमलेले आहेत. या पथकाच्या माध्यमातून सोमवारी (ता. 7) तालुक्‍यातील गांगलवाडी येथील चेक पोस्टवर तब्बल 5 लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. देलनवाडी येथेसुद्धा स्थिर निगराणी पथकामार्फत कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 12 देशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत.

गांगलवाडी-आरमोरी टी पॉइंटवर स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक यांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना एका चारचाकी वाहनामध्ये आढळलेला दारूसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये दीक्षान्त रामदास खोब्रागडे (वय 30, रा. बाबानगर चंद्रपूर), गंगाधर दशरथ कातकर (वय 50, रा. लहान नागपूर चंद्रपूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत अवैध दारू, पैसा, शस्त्र यांची तस्करी रोखता यावी म्हणून तालुक्‍यातील गांगलवाडी-आरमोरी टी पॉइंटवर तपासणी नाका उभारण्यात आला आहे.
या नाक्‍यावर वाहनांची तपासणी सुरू असताना एमएच 34 बीजी 2030 या क्रमांकाची चारचाकी वाहनाची पथकाने तपासणी केली. यावेळी पोलिस शिपाई अरुण कटाईत यांना शंका आल्याने वाहनाची कसून तपासणी केली असता वाहनाच्या डाल्यातील खालच्या भागात अतिरिक्त कप्पे तयार करून दारूची साठवणूक केली होती. यामध्ये 1 लाख 90 हजार रुपये किमतीची 1900 नग संत्रा देशी दारू व 3 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 4 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh liquor was seized at Gangalwadi