व्याघ्रप्रकल्पाच्या प्रगतीत पाच मुख्य अडथळे : एम. एस. रेड्डी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

अमरावती :  जिल्ह्यातील मेळघाट व्याघप्रकल्प देशातील अग्रगण्य व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. परंतु या व्याघ्रप्रकल्पाची प्रगती पाच मुख्य कारणामुळे खोळंबली आहे, अशी खंत मेळघाट व्याघ्रप्रकल्प संचालक एम. एस. रेड्डी यांनी बुधवारी (ता. दोन) व्यक्त केली.
मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे 1 हजार 500.50 चौरस कि.मी., 1 हजार 268 चौरस कि.मी. क्षेत्र बफर झोनमध्ये आले आहे. व्याघ्रगुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात बुधवारी (ता. 2) वन्यजीव सप्ताहानिमित्त रेड्डी यांनी कार्यशाळेनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात अवैध चराई वाढली. त्यातून येथील तृणभक्षी प्राण्यांच्या अन्नावर घाला घातला गेला. दुर्दैवाने जमीनही टणक होत चालली. शिवाय जंगलात आगी लावण्याचे प्रमाण वाढले. त्यातून वनसंपदेचे नुकसान होते. नवीन प्लॅन्टसुद्धा धोक्‍यात येत आहे. वनजमिनीवरचे अतिक्रमण वाढले. अतिक्रमण करून शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. हा सर्वांत मोठा धोका व्याघ्रप्रकल्पाला आहे. काही प्रमाणात बहेलीया आणि बावरीया टोळ्यांच्या माध्यमातून शिकारी केल्या जातात. काहीजण मांस खाण्यासाठी वन्यप्राणी मारतात. त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी जंगलातील गस्त व कॅमेऱ्यांची संख्या वाढविली गेली. या व्यतिरिक्त व्याघ्रप्रकल्पामधून दोन राज्य मार्ग जातात. जड वाहनांच्या आवागमनामुळे हरिसाल, अकोट मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले. अनेक वन्यप्राण्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यावर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न सुरूच आहे, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five main obstacles to the development of tiger project : M. S. Reddy